बीड

लोकनेते बदामराव आबा पंडित यांच्या कुटुंबियांकडून सामान्य कार्यकर्त्यांना आधार…

लोकनेते बदामराव आबा पंडित यांच्या कुटुंबियांकडून सामान्य कार्यकर्त्यांना आधार…

गेवराई प्रतिनिधी -गेवराई मतदारसंघातील मौजे तलवाडा येथे शेतकरी श्री चिमाजी सिताराम जाधव यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेत आठ शेळ्या व १५ कोंबड्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच लोकनेते माजी मंत्री बदामराव आबा पंडित,माजी अर्थ व बांधकाम सभापती युद्धजीत दादा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व यशराज पंडित यांनी तलवाडा येथील घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त जाधव कुटुंबियांना धीर देत मा.जि.प. सभापती युधाजित दादा पंडित यांच्या वतीने जाधव कुटुंबाला ₹११,००० ची आर्थिक मदत देत त्यांच्या दुःखात सहभागी होत आधाराचा हात पुढे केला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शेख खालील भाई,राजाभाऊ खिस्ते,भागवत नाटकर,अभिजित मरकड,बंटी भांबरे,भाऊसाहेब काळे,डॉ.रियाज सौदागर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button