📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जाणिवा आणि संवेदना जाग्या ठेवा- व्याख्याते यजुर्वेंद्र अनिल महाजन

जाणिवा आणि संवेदना जाग्या ठेवा- व्याख्याते यजुर्वेंद्र अनिल महाजन
तालुकास्तरीय शिक्षण परिषद व गुणगौरव सोहळ्यानिमित्य जिंतूरात व्याख्यानाची वैचारिक मेजवानी….

जिंतूर(प्रतिनिधी- सौ अश्विनी मयूर जोशी) या भव्य कार्यक्रमाच्या उद्घाटक महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी सौ मेघना मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जिंतूर, संजरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स व दीपस्तंभ प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शिक्षण परिषद, गुणगौरव पारितोषिक वितरण व प्रेरणादायी व्याख्यान सोहळा दि. १३ एप्रिल २०२६ रोजी श्री राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीन पार्क-२ जिंतूर येथे भव्य-दिव्य, दिमाखदार, नियोजनबद्ध, उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादात, उत्साहात संपन्न झाला.
“प्रत्येक विद्यार्थ्यांचा पंचकोश विकास… हाच आमचा ध्यास…!” या उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जिंतूर द्वारा वर्षभर आयोजित विविध शालेय शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या व विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी आणि सर्वांना कार्यप्रेरणा देण्यासाठी तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे औचित्य साधून संजय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जिंतूर, दीपस्तंभ प्रतिष्ठान जिंतूर, राधाकृष्ण मंगल कार्यालयाचे मालक कैलासराव आदमाने, अरुण बाबुराव शहाणे ज्वेलर्स, सुधीर शहाणे यांचे कृष्णा ज्वेलर्स, शिवाजीराव कदम, राजेश चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा सोहळा  व्याख्याते यजुर्वेंद्र महाजन आंतरराष्ट्रीय वक्ते तथा संस्थापक दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प परभणी श्रीमती रश्मी खांडेकर, सभापती पंचायत समिती जिंतूर सौ. अयोध्याताई किशोर खिस्ते, नगराध्यक्ष नगरपरिषद जिंतूर प्रतापराव देशमुख, उपसभापती पं. स. जिंतूर सौ. सोनाली माधव दराडे, जि प सदस्य रोहित चव्हाण, जि प सदस्य भगवानराव वटाणे, प्राचार्य डायट परभणी डॉ सुदर्शन चिटकुलवार, शिक्षणाधिकारी योजना डॉ. प्रल्हाद खुणे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, गोविंदराव थिटे, शिवाजीराव कदम, भास्करराव ठोंबरे, बालाजीराव  सांगळे, शिवाजीराव काळे, अब्दुल नाफे संजरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स,  विराज बोर्डीकर दीपस्तंभ प्रतिष्ठाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नातून विविध उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा राबवताना लोकसहभागातून एक शैक्षणिक लोकचळवळ उभी करता आली. थोडीशी मदत मागितली तर समाजाकडून भरभरून मदत मिळाली याचा मनस्वी आनंद वाटतो. असे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले म्हणाले

शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक दृष्टीने जन्मतः आपल्याला काय मिळाले ?  कसे मिळाले ? आणि किती मिळाले ? यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करता येऊ शकते? याचे चिंतन, याचा विचार आणि प्रत्यक्ष कृती आणि  सातत्याने केलेल्या प्रयत्नातून शारीरिक दिव्यांगत्व असणारे विद्यार्थी सुद्धा उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. आपले जीवन यशस्वी करू शकतात. अशा कित्येक दिव्यांग, अनाथ, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मी माझ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या संस्थेत घडवण्याचा प्रयत्न केला आहे. घडताना पाहिले आहे. त्यांना घडविले आहे. “दिव्यांग व्यक्ती नसतात तर दिव्यांग असतात समाजाच्या नजरा” त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला दोष न देता प्राप्त परिस्थितीमध्ये भरपूर प्रयत्न करा, निराधार, दिव्यांग आणि गरजूंचा आधार बना. त्यांचे मनोबल वाढवा. आपण स्वतः घडा आणि इतरांना घडण्यासाठी मदत करा. आपल्या मानवी हृदयातील जाणीव आणि संवेदना जिवंत ठेवा, जागृत ठेवा. असे आपल्या हृदयस्पर्शी व्याख्यानामध्ये व्याख्याते यजुर्वेंद्र अनिल महाजन म्हणाले.
मान्यवरांच्या आगमनाच्या वेळी स्वागतासाठी साकारण्यात आलेली शैक्षणिक झाकी व लेझीम पथक यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. लेझीम पथकातील विद्यार्थ्यासोबत मान्यवरांनी सुद्धा लेझीम खेळली. या भव्य सोहळ्यात  जवळपास 1750  विद्यार्थी, शिक्षक यांना 350 सन्मानाद्वारे सन्मानित करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र ढाकणे, केशव घुगे, दिलीप रेंगे, प्रकाश पांडे, डी यू राठोड, मारुती घुगे, दिनकर घुगे, पांडुरंग भांबळे, देवानंद सावंत, निलेश लटपटे, माधव धोसलवार, कैलास गवई, मनोज तोडकर, संजय स्वामी, दिलीप साबळे,  कपिलकुमार देवडे, सचिन हजारे, शंकर माने, विष्णु शिंदे, हिरामण वाघमारे,  प्रवीण कोटगिरे, योगेश देशमुख, जयसिंग जाधव, अनिल स्वामी, गजानन कुरे, हनुमान गायकवाड, नितीन पेठे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विशेष शिक्षक यांनी मेहनत घेतली

Back to top button