ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे ‘गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे ‘गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित
जामखेड प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६-२७ चा मानाचा ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब आप्पा पारखे यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. सत्यजित तांबे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या आदर्श कार्याची दखल घेत त्यांनी समाजासमोर एक नवा वस्तुपाठ निर्माण केला असल्याचे प्रशस्तीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिल्हा सरचिटणीस मिथुन डोंगरे यांच्यासह प्रा. संजय वराट, दशरथ कोपनर, भगवान मडके,भरत लहाने, दत्तात्रय काळेआदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व संचालक मंडळ तसेच ल. ना. होशिंग विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पारखे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



