विद्यार्थ्यांमधूनच घडेल व्यसनमुक्त समाज : भारती दीदी

विद्यार्थ्यांमधूनच घडेल व्यसनमुक्त समाज : भारती दीदी
तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेत व्यसनमुक्ती अभियान
जामखेड प्रतिनिधी : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी भारती दीदी यांनी केले.
शहरातील तपनेश्वर परिसरातील येथे गुरुवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी जि.प.प्राथमिक शाळेत आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या उपक्रमासाठी उपस्थित अमोल खराडे, नेहा फाळके यांच्यासह मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापक प्रताप पवार, उपाध्यापिका जयश्री पाटील, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे यांच्या सह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विविध व्यसनांचे आरोग्यावर होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच लहान वयापासूनच व्यसनांपासून दूर राहून निरोगी, शिस्तबद्ध व संस्कारक्षम जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ हा संदेश आत्मसात करत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.



