📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसारखे बोलावे, फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावी

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय सत्ता महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये त्यातच आता भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. त्यांचे बोलणे समजण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो. 25 वर्षे स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजप युती जपली, उद्धव ठाकरे यांनी नाही. सेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केलाय. १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता, ते जंगलात फिरत होते.

भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध. तुटलं काय किंवा जुळलं काय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत. त्यानंतर बोलायला शिका आणि मग कुणी 25 वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा.

Back to top button