बीड

अपक्ष उमेदवार प्रेम कांबळे यांची प्रभाग क्र.१४ मधून माघार  

अपक्ष उमेदवार प्रेम कांबळे यांची प्रभाग क्र.१४ मधून माघार
शिवसेनेच्या धम्मप्रिया रवी वाघमारे यांना जाहीर पाठिंबा
बीड दि.२१ (प्रतिनिधी) नगरपरिषद निवडणूक उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची काल शेवटची तारीख होती. अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून अपक्ष उमेदवार प्रेम कांबळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रभाग क्रमांक १४ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सौ.धम्मप्रिया रवी वाघमारे यांना जाहीर पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
या भागात बौद्ध समाज मोठ्या संखेने असल्यामुळे मतांची विभागणी होऊ नये. तसेच आमिरचे उमेदवार हे कार्यक्षम नसल्याने प्रभागाचा विकास होणार नाही. सौ.वाघमारे यांची उमेदवारी प्रभागाच्या विकासात निर्णायक भूमिका ठरणार असल्यामुळे प्रेम कांबळे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. प्रेम कांबळे आणि रवी वाघमारे हे अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीमध्ये सोबत राहून काम करत आहेत. रस्त्यावरच्या अनेक लढ्यात दोघांनी दलित समाजासाठी काम केलेलं आहे.
Back to top button