कारधा पोलिसांची एकच धडक कारवाई; अवैध हातभट्टीचा 58 हजारांचा मुद्देमाल जप्त
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
कारधा (जि. भंडारा) :गुप्त माहितीच्या आधारे कारधा पोलिसांनी मौजा करचखेडा येथील वैनगंगा नदीकाठावर छापा टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई करून उध्वस्त केली.
या कारवाईत आरोपी नंदा गणेश भुरे (वय ४०, रा. करचखेडा) हिच्या ताब्यातून गरम मोहापास, ५२० किलो सडवा मोहापास, २० लिटर हातभट्टी दारू व अन्य साहित्य असा मिळून एकूण ५८,००० रुपयाचे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.