📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

खुनाच्या आरोपातून आरोपीची जामीन मंजूर  :- ॲड.सचिन काळे

खुनाच्या आरोपातून आरोपीची जामीन मंजूर  :- ॲड.सचिन काळे
डोक्यात दगड घालून जीव मारल्या च्या आरोपातून लिंबाजी कानडे याची जामीन मंजूर थोडक्यात माहिती अशी की दि.१४/११/२०२४ रोजी तुम्ही माझे घरी असताना मला माझी भाउजई ने फोन करून कळविले की तुमचा भाऊ मजहर याला कोणीतरी जीवे मारून टाकले आहे तुम्ही स्मशानभूमी जवळ मडगी येथील कच्च्यारोड वर लवकर या असे कळवल्याने मी माझ्या मोटरसायकलवर त्या ठिकाणी गेलो तिथे पोलीस व माझी भाऊजई व इतर बरेच लोक जमा झाले होते माझा भाऊ मजहर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर मृत अवस्थेत पडलेला होता त्याच्या डोक्यातून तोंडातून नाकावाटे कानातून रक्त निघून जमिनीवर बरेच रक्त पडलेले दिसत होते त्याचे डोक्यावर कपाळावर डोळ्याजवळ बऱ्याच जखमा दिसत होत्या त्याच्य डोक्या जवळ व कंबरे जवळ दगडे पडलेली दिसत होती व त्या दगडाला रक्त लागलेले दिसत होते त्याच्या प्रेताच्या बाजूला थोड्या अंतरावर त्याची स्कुटी रस्त्यावर पडलेली दिसत होती पोलिसांनी पंचनामा करून त्याचे पप्रेत सरकारी दवाखाना बीड येथे पीएम करण्यासाठी घेऊन गेले माझ्या भावाचे गेले एका वर्षापासून एका महिलेशी अनैतिक संबंध होते माझ्या भावाचे सोबत असलेला अनैतिक संबंध बाबत मला व त्याच्या पत्नीला माझा भाचा मोसिन असे आम्हाला माहिती होते पोलिसांनी अनैतिक संबंध असलेले महिला व लिंबाजी कानडे राहणार वाक्नाथपुर बीड तालुका जिल्हा बीड यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी चालू आहे तरी दिनांक 14/११/२०२४ सकाळी ११ वाजण्याच्या पर्वी मडकी मोंढा रोड बीड येथील नदीच्या पात्राच्या पश्चिम लागत असलेल्या कच्च्या रस्त्यावर सावता समाज मंदिराच्या समोर रस्त्यावर माझा भाऊं नामे सय्यद मजहर सय्यद अख्तर वय 42 वर्ष राहणार हवेली तांदळवाडी तालुका यांचे प्रियसी व तिच्यासोबत असलेला लिंबाजी लक्ष्मन कानडे व अज्ञात  लोकांनी त्यास अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून जीवे ठार मारले अशी फिर्याद शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती तरी त्यास गु.र.नं २७०/२४  कलम १०३,३ (५) बी.एन.एस नुसार गुन्हा नोंद झाला होता सदर आरोपीने न्याय मिळवण्यासाठी ॲड.सचिन काळे यांच्या वतीने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आरोपी यांचे विकिल यांनी केलेला बचाव व युक्तिवाद इत्यादी बाबी ग्राह्य ग्राह्य धरून मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आरोपीच्या वतीने ॲड.सचिन काळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड.पवन नागरगोजे यांनी सहकार्य केले
Back to top button