📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विनयभंग प्रकरणात 24 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल, बीड शरह पोलीसांची कारवाई, एकाच महीन्यातील 3 री कारवाई…

विनयभंग प्रकरणात 24 तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल, बीड शरह पोलीसांची कारवाई, एकाच महीन्यातील 3 री कारवाई…
काल दिनांक 22/03/2025 रोजी नसींग कॉलेजच्या विद्यार्थिनीं शहरामध्ये त्यांचा अभ्यासा संदर्भात सर्वे करत असताना दोन टवाळखोर 1. महेश भारत झेंडे, वय 23, राहणार धांडे गल्ली बीड 2. धनंजय भागवत शिंदे, 33, राहणार, धांडे गल्ली, यांनी विद्यार्थीनींच्या अंगावर चिट्ठी फेकत त्यांची छेड काढली होती. त्यावेळी बीड शहर पोलीसांना माहीती मिळताच त्यापैकी एका आरोपीस बीड शहर पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन बीड शहर येथे हजर केले होते. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गु.र.नं. 47/2025 भा.न्या.सं. कलम-78,3 (5) प्रमाणे दि.22/03/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार यांनी तपासकामी विशेष पथकाची नेमणुक केली. सदर गुन्हयातील आरोपीताविरुध्द बीड शहर पोलीसांनी वेळ न दवडता २४ तासाचे आत आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कायद्यानुसार कारवाई करुन घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविले. तसेच तपासात आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करुन आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा गोळा केला.
महिला अत्याचाराच्या गुन्ह्या संदर्भात आणि खासकरून विनयभंगाच्या गुन्हे संदर्भात लवकरात लवकर आरोप पत्र पाठवून असे खटले लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी, गुन्हे करणाऱ्या आरोपींना धाक निर्माण करण्यासाठी, असे खटले लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत साहेब यांनी सर्व ठाणे प्रभारींना सूचना केलेल्या आहेत. या अनुषंगाने सदरील प्रकरणाचा तपास करण्यात येऊन यातील आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र हे 24 तासाच्या आत तयार करण्यात आले आणि मा. प्रथमवर्ग न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत सर, अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वांबर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार तसेच त्यांचे पथकातील पोलीस हवालदार 1011 संदीप व स. फौ. 752 बाळासाहेब यांनी केली आहे.
Back to top button