बीड

जिव्हाळा फाउंडेशन आयोजित लोकशाही मूल्यांचा जागर जामखेडमध्ये अनोखा उपक्रम

जिव्हाळा फाउंडेशन आयोजित लोकशाही मूल्यांचा जागर जामखेडमध्ये अनोखा उपक्रम

शहाजी डोके सरांच्या ७५व्या वर्षानिमित्त विशेष आयोजन

जामखेड, प्रतिनिधी :
बदलत्या सामाजिक वातावरणात लोकशाहीच्या मूल्यांचा पुन्हा एकदा जागर करण्याचा संकल्प जामखेडमध्ये साकार होत आहे. समाजात बंधुभाव, सलोखा आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी ‘जागर लोकशाहीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे.
जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमातून विविध क्षेत्रांत कार्यरत समाजसेवक, नागरिक आणि जबाबदार व्यक्तींना एकत्र आणले जाणार आहे. लोकशाहीची जाणीव अधिक बळकट करण्याबरोबरच सामाजिक नीतिमत्ता सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच समाजातील अनिष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काय करावे, यावर चिंतन होणार आहे.
अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व शहाजी डोके सर यांच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती रमेश गुगळे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी संतोष पवार असणार आहेत.
मंगळवार (दि. २४) रोजी सायंकाळी ६.३० वाजता खर्डा रोड येथील केशर हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button