बीड

टप्पावाढीसाठी 8 व 9 जुलै रोजी शिक्षक समन्वय संघाचे शाळा बंद आंदोलन!

टप्पावाढीसाठी 8 व 9 जुलै रोजी शिक्षक समन्वय संघाचे शाळा बंद आंदोलन!

आंदोलनास मराठवाडा शिक्षक संघाचा पाठींबा!

बीड  (दिनांक 4 जुलै): 14 ऑक्टोबर 2024 च्या शासनादेशानुसार विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना टप्पावाढ मिळावी म्हणून 5 जुन 2025 पासून शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. सरकार त्याची दखल घेत नसल्याने शिक्षक समन्वय संघाने 8व व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. मराठवाडा शिक्षक संघाने या आंदोलनास पाठींबा दिला असून शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता टप्पावाढ देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एकीकडे शिक्षकांना देशाचा शिल्पकार म्हणायचे, त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करायचा. आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्याला उपाशी मारायचे. हेच का तुमचे शिक्षक प्रेम? राज्यातील कायम शब्द काढलेल्या सुमारे चार हजार विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांवर हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेले पाव शतक उपाशीपोटी काम करत आहे. तुम्हीच केलेले कायदे तुम्ही पाळायला तयार नाहीत.  वेतन मागितले तर लाठ्या मारता वर आमच्यावरच हाफ मर्डर गुन्हे दाखल करता! तुम्हाला याची थोडी तरी शरम वाटली पाहिजे. टप्पा अनुदानासाठी 5 जून पासून राज्यातील शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. यापूर्वीही याच मागणीसाठी शेकडो आंदोलने झाली आहेत.परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारने फक्त जिम्मेदारी ढकलण्याचे काम केले आहे. यामुळे राज्यातील शिक्षकांमधे तीव्र असंतोष, संताप आणि चीड निर्माण झाली आहे.  याचा परिपाक म्हणून शिक्षक समन्वय संघाने दोन दिवशीय शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. मराठवाडा शिक्षक संघाने या आंदोलनास पाठींबा दिला आहे. टप्पावाढ न देण्यात आल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा ईशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष औताडे ए. बी., माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दिनकर शिंदे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण, हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके, सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे, बी. टी. खाडे यांनी दिला आहे यांनी दिला आहे.

Back to top button