बीड

व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या आहे.- मु.अ.परशुराम सोंडगे 

व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या आहे.- मु.अ.परशुराम सोंडगे
महिला महाविद्यालयात ‘आजीवन शिक्षण आणि विस्तार’ विभागाची कार्यशाळा संपन्न.
==============
गेवराई दि. २७ (प्रतिनिधी) युवक हे देशाचे आधारस्तंभ असतात. युवकच जर व्यसनाधीन झाले तर समाज आणि राष्ट्र प्रगती करु शकणार नाही. म्हणून व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या आहे. असे प्रतिपादन मु.अ. परशुराम सोंडगे यांनी केले. ते महिला महाविद्यालय, गेवराई येथे ‘आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग’ द्वारे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई च्या ‘आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग’ च्या वतीने ‘व्यसनाधिनता आणि युवक: प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मु.अ. परशुराम सोंडगे म्हणाले की, व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात युवक स्वतः चे व परिवाराचे नुकसान करुन घेत आहेत. सिगारेट व तंबाखू वर वैधानिक इशारा असुन ही त्यांचे व्यसन केले जाते. व्यसनामुळे त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. व्यसन हे अनूभव घेण्याची गोष्ट नाही. त्यामुळे क्षणभंगुर आनंदाच्या मागे धावू नका. मोहाच्या क्षणाला बळी पडू नका. असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे म्हणाले की, आधुनिक युग हे स्त्री पुरुष समानतेचे युग असुन आजकाल मुलींमध्ये ही व्यसनाधीनता वाढत आहे. सोशल मीडिया चा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीनींनी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या परिवारातील सदस्यांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सजग राहीले पाहिजे. असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी सर्व विद्यार्थीनींना व्यसनमुक्ती ची शपथ दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी केले. सुत्र संचालन प्रा. गोकुळदास कदम यांनी तर प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
Back to top button