बीड
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी सकल समाज

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी सकल समाज
बांधवानी लाक्षणीय उपोषणासाठी उपस्थित रहावे -प्रा.भगवान माने, अॅड.राजु शिंदे
बीड,दि.21(प्रतिनिधी)ः धनगर-धनगड एकच असून धनगर अनुसचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना येथे आमरण उपोषणास बसलेले संघर्ष योध्दा मा.बोर्हाडे साहेब यांना पाठींबा देण्यासाठी, अनुसूचीत जमाती महाराष्ट्र शासन अनु.जमाती यादी क्र.36 वरील धनगड-धनगर एकच फक्त र-ड अपभ्रष दुरूस्तीसाठी, धनगड वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे अनुसूचचित यादी क्र.36 वरील धनगड-ऐवजी धनगर अशी शासनाने छत्तीसगड, बिहार, ओरीसा प्रमाणे धनगर एस.टी.प्रमाणपत्र (अनु-जमाती) करण्यासाठी शासनास भाग पाडण्यासाठी राज्यसरकारने विधीमंडळाचा एकमुखी ठराव घेवून केंद्र शासनास पाठविण्यासाठी एक दिवशीय लाक्षणीक उपोषण यशस्वी करण्यासाठी सर्व/सकल धनगर बाधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सोमवार दि.22 सप्टेंबर रोजी 10 ते 5 वाजेपर्यंत उपस्थित रहावे.
सकल धनगर बांधव विद्यार्थी, महिला, सेवा निवृत्त बांधव यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद देत या उपोषणास उपस्थित रहावे. आपल्या घटनात्मक हक्क मिळविण्यासाठी या उपोषणास सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.भगवान माने, अॅड.राजु शिंदे, अण्णासाहेब मतकर, गणेश कोळेकर, अंकुश येळे, लक्ष्मण मस्के, लांडकमारे, गुलांब भोंडवे, सतिष खरात, ईश्वर वाघमोडे, शिवाजी उघडे, सचिन कोळेकर, गणपत तागड, कृष्णा पितळे, शिवाजी चांगण, आदी समाजबाधंवानी केले आहे.