बीड

भंडाऱ्यात ‘५० हजाराचा तलाठी पॅटर्न’ व्हायरल; लोकांनी व्हिडिओ बनवला कारण “चुकीच्या मार्गाने पैशाची देवाण-घेवाण” होत असल्याची शंका – कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन

भंडाऱ्यात ‘५० हजाराचा तलाठी पॅटर्न’ व्हायरल; लोकांनी व्हिडिओ बनवला कारण “चुकीच्या मार्गाने पैशाची देवाण-घेवाण” होत असल्याची शंका – कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील माटुरा परिसरातील समोर आलेल्या कथित अवैध रेती ट्रॅक्टर वाहतूक कारवाईच्या प्रकरणाने आता जिल्हा पातळी ओलांडून राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि नागरिकांमध्ये वाढत चाललेला रोषे पाहता, तात्काळ प्रशासकीय कारवाई झाली नाही तर नागरिक ठोस पाऊल उचलतील, असा स्पष्ट इशारा दिला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, माटुरा परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना दुजाभाव होत असल्याची जोरदार चर्चा आहे. काही ट्रॅक्टरवर कठोर कारवाई केली जाते, तर काही ट्रॅक्टर कथित समजुतीनंतर सोडले जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हजार रुपयांच्या कथित व्यवहाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी पाहिल्याचे सूत्र सांगतात.
या व्हिडिओत रंगेरंग भरात पैसे देताना-घेताना, कोपऱ्यामध्ये/लपिचुरीने पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचा दावा केला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “जर व्यवहार शुद्ध असतो, तर व्हिडिओ का बनवला? लोकांनी तो व्हिडिओ बनवला याचा एकच कारण आहे—चुकीच्या मार्गाने पैशाची देवाण-घेवाण होत असल्याची शंका.”
यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत—
हे पैसे कोणत्या कारणाने दिले जात आहेत?
तलाठी रेती माफियालाच उधारी पैसे का देतो?
एवढा मोठा तलाठी अमीर आहे का जो दुसऱ्यांना उधारी पैसे वाटत फिरतो?
जर उधारी पैसे दिले असते, तर चार लोकांच्या समोर हे पैसे का घेतले नाहीत?
उधारी पैसे असते तर ते पैसे घरात जाऊन का घेतले नाहीत?
या प्रश्नांमुळे प्रशासनाला तात्काळ स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, संबंधित अधिकारी पदावर कायम राहिल्यास निष्पक्ष चौकशीवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच अनेक ट्रॅक्टर मालक भीतीपोटी उघडपणे पुढे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे तात्काळ निलंबन करून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करणे हाच एकमेव मार्ग असल्याची ठाम मागणी नागरिक आणि सामाजिक घटकांकडून होत आहे. नागरिक स्पष्ट करीत आहेत की, ही मागणी कोणावर थेट आरोप करण्यासाठी नाही, तर “असले प्रकार सहन केले जाणार नाहीत” हा संदेश देण्यासाठी आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर येत्या काळात संबंधित तलाठीवर कारवाई, व्हायरल व्हिडिओची अधिकृत दखल आणि वेळबद्ध चौकशी जाहीर झाली नाही, तर नागरिकांकडून लोकशाही मार्गाने पण निर्णायक स्वरूपात आंदोलन, सामूहिक निवेदने, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे थेट दाद आणि राज्यस्तरीय माध्यमांतून आवाज उठवला जाईल.
“हा प्रश्न भंडाऱ्यात थांबणार नाही”, असा स्पष्ट इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
प्रशासकीय जाणकारांच्या मते, निलंबन म्हणजे दोषसिद्धी नव्हे, तर प्रशासनाची विश्वासार्हता ं
माटोरा तलाठी
आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात —
निर्णय आज, की उद्या उशिरा?
Back to top button