रत्नागिरी

गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या शुभ हस्ते मंडणगड शहरातील साईनगर मधील उद्यानांचे लोकार्पण

शहरातील पहिले उद्यान “महाराष्ट्र भूषण तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी नाना-नानी पार्क साईनगर”.

मंडणगड प्रतिधिनी

मंडणगड शहरातील साई नगर येथील प्रभाग क्र.05 मधील नगरसेवक श्री.योगेश वसंतरा जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि संकल्पनेतून शहरातील पहिले नाना-नानी पार्क येथील रहिवासी व नागरिकांना सेवेशी उपलब्ध करुन देण्यात आले.

“महाराष्ट्रा भुषण तिर्थरुप श्री नानासाहेब धर्माधिकारी”यांच्या नावाने नाना नानी पार्कच उद्घाटन ना.मंत्री श्री.योगेश दादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगर सेवक श्री योगेश जाधव यांनी मंत्री महोदयाचे आभार मानले. मंत्री योगेश दादा कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावे व आपल्या भागातील लोकांना त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख तथागटनेते श्री विनोद जाधव व श्री.चेतन सातोपे यांनी केले तर आभार साईनगर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संतोष शेठ मांढरे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला शिवसेना युवा सेना मंडणगड शहर व तालुका कार्यकारणी तसेच
मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख श्री.प्रतापजी घोसाळकर, मुख्य कार्यकारी श्री.महादेव रोडगे, नगरपंचायत मंडणगड श्री.प्रमोद कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी सां.भा विभाग.
श्री किरण कुलधर कनिष्ठ अभियंता सा. भा विभाग मंडणगड,नगरसेवक मुस्ताक दाभिलकर, आदेश मर्चंडे, निलेश सापटे, नगरसेविका सौ.सेजल गवळे सौ.वैशाली रेगे, सौ.प्रमिला किंजले, सौ.नम्रता पिंपळे, सौ.रेशमा मर्चंडे,
तसेच साईनगर मधील राहिवाशी श्री अर्जुन भोसले ऍड. मिलिंद लोखंडे,श्री अनिल कळमकर, श्री राजू शेठ गावडे, श्री घस्ते साहेब, श्री ओमसेन सोविलकर, श्री.काळभोर,श्री.शिंदे मामा, श्री ज्ञानदेव निकम, श्री जयराम राठोड, श्री अभिजीत विलणकर, श्री शंकर जंगम, श्री,राजू पटेल, श्री अक्षय भगत, श्री उदय भुवड, श्री पेवेकर, तसेच साईनगर उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली पुदाले, सौ.संपदा भगत,सौ.शितल पिंपळे,सौ नुपूर जाधव, सौ.सोविलकर,सौ काळभोर. सौ. शिंदे सौ. कामिनी लेंढे,सौ. छाया घस्ते सौ.विलनकर, सौ.कलमकर, सौ.गावडे सौ.तोडकर, सौ.मीना पद्मानी,सौ. प्रिया लेंढे यांच्या सह
शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button