रायगड

रायगड प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता चौथी या परिक्षेसाठी वडवली कोंड शाळेतील विद्यार्थी ठरले विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण..

रायगड प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता चौथी या परिक्षेसाठी वडवली कोंड शाळेतील विद्यार्थी ठरले विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण…

गोरेगाव प्रतिनिधी: विकास आग्रे

दिनांक १६ एप्रिल रोजी झालेल्या रायगड जिल्हा परिषद अलिबाग गुणवत्ता विकास अंतर्गत रायगड प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता चौथी साठी घेण्यात आलेल्या परिक्षेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवली कोंड ( केंद्र दहिवली) या शाळेतुन विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश. या परिक्षेसाठी शाळेतुन एकुण चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये चारही विद्यार्थीनी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. या यशस्वी विद्यार्थीनींची नावे पुढीलप्रमाणे: ( १) स्वरांजली धर्मराज चिकणे हिची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. (२) काव्या परेश गायकवाड हिने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. (३) आरोही दिनेश खामकर हिने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. (४) खुशी सुशील खामकर हिने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली असुन आपल्या शाळेच नाव उंचावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्या शिक्षकांची नावे ही खालील प्रमाणे: (१) श्री.धर्मराज गोविंद चिकणे सर – मुख्याध्यापक (२) श्री. सिध्दांत पोपट देवरे सर – उपशिक्षक (३) श्री. पद्माकर दशरथ सांगळे सर- उपशिक्षक (४) सौ. स्वप्नाली वैभव सुर्यवंशी मॅडम- उपशिक्षिका आणि ह्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले ते – श्री. धोंडीराम एस. सुर्यवंशी साहेब – केंद्रीय प्रमुख दहीवली. ह्या परिक्षांचा खरा उद्देशार्थ हा विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील विविध स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणे व यातुन अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विविध UPSC, तसेच MPSC यांसारख्या शासकीय स्पर्धा परिक्षेत भविष्यात रायगड जिल्ह्याचा टक्का वाढविण्यासाठी ही परिक्षा घेतली गेली. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शैक्षणिक जिवनात प्रोत्साहन मिळाले तर निश्चितच भविष्यात शासकीय अधिकारी घडल्या शिवाय राहणार नाहीत. ह्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असुन आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थीनींनी मिळवलेले हे यश म्हणजे अभ्यासाची तळमळ, सातत्यपूर्ण मेहनत आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या योगदानाचे फळ आहे.

Back to top button