बीड
क्रांतीनगर लालनगर आकाश नगरच्याच विकासासाठी जगन्नाथ पाटोळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा

क्रांतीनगर लालनगर आकाश नगरच्याच विकासासाठी जगन्नाथ पाटोळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा
*प्रचाराला सर्वच समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार झाली असून सर्वच पक्षांसह आघाडीच्या उमेदवारांनीही प्रचाराचा जोर वाढविला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) लाल बावटाचे उमेदवार जगन्नाथ श्रीहरी पाटोळे यांच्या प्रचाराला सध्या मोठी गती मिळत असून विविध समाजघटक त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देताना दिसत आहेत. जगन्नाथ पाटोळे हे पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज घटकातील लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत. त्याचबरोबर ते उत्तम खेळाडू असल्याने त्यांचा जनसंपर्क सुद्धा मोठा आहे. पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणून कामे करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांचा पूर्ण विश्वास आहे.
त्यांच्या सामाजिक कामकाजाबद्दल प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर समाधानी असल्याने या निवडणुकीत त्यांनी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) लालबावटा कडून निवडणूक लढवत आहे. क्रांतीनगर लाल नगर या भागात लाल बावटाचे अनेक कार्यकर्ते निस्वार्थपणे त्यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन सध्या प्रचार करत आहे.घरोघरी जाऊन महिला,पुरुष जगन्नाथ पाटोळे यांचा प्रचार करत आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून जगन्नाथ पाटोळे यांचा विजय निश्चित असल्याचे आम जनता चर्चा करू लागली आहे. त्यामुळे जगन्नाथ पाटोळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आव्हान अजय बुरांडे सुहास चंदनशिव प्रशांत मस्के रामदास घाडगे विजय इंगळे आकाश कसबे नरेश चव्हाण अजिंक्य सरवदे अनिल फुले यांनी केले आहे.



