सौ. के. एस. के.महाविद्यालयात स्वयंनिर्वाही सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

सौ. के. एस. के.महाविद्यालयात स्वयंनिर्वाही सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
बीड (प्रतिनिधी): येथील नवगण शिक्षण संस्था संचलित, सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) कला, विज्ञान व वाणिज्य्
महाविद्यालयात आजीवन शिक्षण व विस्तार विभागा अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध स्वयंनिर्वाही (Self-Financed) सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर आणि आजीवन शिक्षण विस्तार विभाग प्रमुख डॉ. राहुल सोनवणे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देऊन त्यांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या सहामाही अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे:
यामध्ये सौंदर्य प्रसाधन व व्यक्तिमत्त्व विकास , ग्रामीण पत्रकारिता, बालवाडी व अंगणवाडी, विक्री प्रतिनिधी, दुग्ध्
व्यावसाय, ग्रंथालय व्यवस्थापन , सर्टिफिकेट कोर्स इन कम्युनिकेटीव इंग्लीश याचा कालावधी 6 महिने (सहामाही प्रमाणपत्र अभ्यासक्रम) नियमित पदवी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त कौशल्य प्रमाणपत्र मिळवता येईल, ज्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी वाढतील.
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या डॉ. गायके पी. पी., डॉ. शेख जी. आय., डॉ. फटाले वंदना, डॉ. रामनाथ वाढे, डॉ. दुष्यंता रामटेके, डॉ. खान ए. एस. यांच्याशी व आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधून आपले प्रवेश निश्चित करावेत. प्रवेश मर्यादित जागांसाठी असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.


