संपादकीय

जामखेड शहर कृती समिती स्थापन; अध्यक्ष बाबासाहेब चंदन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहराच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून आणि निवेदने देवूनही समस्या जैसे थे च आहेत म्हणून शहरातील त्रस्त नागरिकांनी एकत्र येत अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी, प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यासाठी बीड रोड जामखेड येथे दि १०/१०/२०२५ रोजी मिटिंग आयोजित केली होती.यावेळी सुनिल जगताप यांनी या अडचणी सोडवण्यासाठी शहराची कृती समिति असावी असा ठराव मांडला याला सर्वानुमते मान्यता दिली. अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चंदन यांची तर उपाध्यक्षपदी सतिश राजगुरु यांची आणि प्रफुल्ल सोळंकी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली होती. यावेळी सुनिल जगताप यांनी या अडचणी सोडवण्यासाठी शहराची कृती समिति असावी असा ठराव मांडला. याला सर्वानुमते मान्यता दिली. अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चंदन यांची तर उपाध्यक्षपदी सतिश राजगुरु यांची आणि प्रफुल्ल सोळंकी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.यावेळी सल्लागार म्हणून सुनील जगताप, अॅड. महारुद्र नागरगोजे व अॅड. ऋषीकेश डुचे यांची निवड करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिक सदस्य म्हणून कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले. यावेळी अनेकांनी शहरातील समस्यांबाबत पोटतिडकने मूद्दे मांडले.यावेळी आकाश बाफना,अशोक पितळे, महेंद्र कदम, विजय राळेभात, बालाजी आजबे, रमेश कोल्हे,बालाजी राळेभात, प्रशांत शिंदे, अनिल जगदाळे, आनंद बाफना, मनोज राउत, गणेश आजबे, भास्कर डहाळे, नितीन मुनोत, अमोल पेचे, महेश यादव, महेश भोगल, प्रमोद गांधी, प्रतीक राळेभात , आप्पासाहेब सोंडगे, बाळासाहेब मुळे, तुषार बोरा, तुषार बोथरा आदी उपस्थित होते.
सदर समीती गठीत होताच मुख्य रस्त्यावरील धूळ, शहरातील स्वच्छता, पार्कींगसाठी जागा मोकाट जनावरे आदि प्रश्नांसंदर्भात मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांना निवेदन दिले तसेच मेन बाजार पेठेतील गर्दी लक्षात घेता वाहतुक संदर्भात पोलीस निरिक्षक व तहसीलदार यांना व वरील कामे दिवाळी पुर्वी करावेत अशी विनंती केली.प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांमधुनही मागणी होत आहे.

Back to top button