संपादकीय

गृहमंत्री तुमचे, मग गुन्हे का दाखल केले नाहीत? – आशिष शेलारांचा मालिकांना टोला

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सरकारी पदे दिली. त्यांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केले. यावर आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सडेतोड प्रतिउत्तर देत थेट मालिकांवर निशाणा साधला आहे.

भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची सरबत्ती केली. मलिक यांच्या या आरोपानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलं. हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मात्र आरोप करताना मालिकांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे. मलिक यांनी तसाच प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही. राज्य सरकारच्या यंत्रणा कामाला लागूनही ते फडणवीसांवर आरोप लावू शकले नाहीत, असं शेलार म्हणाले.

Back to top button