बीड

हा शंकर बर्डे चा खुण पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे:–एकलव्य भिल्ल समाज संघटना उग्र आंदोलनाच्या तयारीत 

हा शंकर बर्डे चा खुण पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे:–एकलव्य भिल्ल समाज संघटना उग्र आंदोलनाच्या तयारीत
:– प्रमुख आरोपींना अद्याप अटक नाही; न्यायासाठी उद्या कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलन
बीड | प्रतिनिधी
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये झालेल्या शंकर अंकुश बर्डे (वय २५) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अद्याप मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त नातेवाईक व आदिवासी बांधवांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला संघटनेच्या संस्थापिका सौ सुमित्राताई दशरथ पवार व अँड सुर्यकांत दशरथ पवार दिला. “जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा निर्धार संघटना व नातेवाईकांनी व्यक्त केला.
पाडळी येथील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांना गावातील काही वर्चस्ववादी लोकांकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. “गावात राहू देणार नाही, जिवे मारू, घरे जाळून टाकू,” अशा धमक्यांमुळे शंकर बर्डे यांच्या कुटुंबाने ११ मे रोजी बीड पोलिस अधीक्षकांकडे संरक्षणासाठी शंकर बर्डे आणि परिवार यांनी भेट घेऊन लेखी अर्ज दिला होता. मात्र, या अर्जावर तातडीने कारवाई झाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, १५ मे रोजी आरोपी वाहनातून भिल्ल वस्तीवर आले आणि “गायरान जमिनीवर का राहता?” या कारणावरून वाद घालत घरात घुसून शंकर बर्डे यांच्यावर काठ्या, दगड व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सौ सुमित्राताई पवार आणि अँड सुर्यकांत पवार व संतप्त नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धडक देत आरोपींवर तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निष्कासित कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.
मात्र, अद्याप प्रमुख आरोपींना अटक न झाल्याने नातेवाईक आणि आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटन व परिवार च्या वतीने जो पर्यंत प्रमुख आरोपी पकडले जात नाही तो पर्यंत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असून, आरोपींना तात्काळ अटक, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, तसेच निष्काळजी पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
Back to top button