बीड

लिंबागणेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

लिंबागणेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
बीड :-(दि. ३१) : बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आज दि. ३१ रविवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची ३०१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. गणेश ढवळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जीवनपट उलगडून सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘पुण्यश्लोक’ हा शब्द अहिल्यामाईंच्या पुण्यकर्मांचा आणि जनकल्याणकारी कार्याचा गौरव करणारा आहे. पुराणातील अर्थानुसार पुण्यश्लोक म्हणजे पवित्र, चारित्र्यसंपन्न आणि आपल्या पुण्यकर्मांद्वारे जनहित साधणारी व्यक्ती होय.
भारतीय इतिहासात आपल्या पराक्रम, शौर्य आणि आदर्श राज्यकारभारामुळे अजरामर स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अहिल्यादेवी होळकर असल्याचे त्यांनी नमूद केले. काशीपासून रामेश्वरपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी आदींची उभारणी व जीर्णोद्धार हे त्यांचे कार्य केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून त्यामागे दूरदृष्टी, प्रजाहितदक्षता, न्यायप्रियता आणि कुशल प्रशासनाची भूमिका होती. त्या एक मुत्सद्दी राजकारणी, कर्तव्यदक्ष सेनानी आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या आदर्श शासक होत्या, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, रविबापू निर्मळ, अनंतकाका मुळे, यश जाधव, रामदास मुळे, शहादेव धलपे, गोवर्धन मुळे, संदीप मुळे, महावीर मुळे, विठ्ठल तागड, शिवम कोकाटे, नवनाथ मुळे, विशाल तागड, सुमुख मुळे, अमोल गिरे, गणेश तागड, श्याम गिरे, प्रविण मुळे , सुरज कदम, दादा गायकवाड, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२
Back to top button