लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे पुरस्कार जाहीर

लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे पुरस्कार जाहीर
पाथर्डी तालुक्यातील पत्रकार अनिल कुमार खाटेर, ह भ प अमोल म. सोळशे, संभाजीराव बडे, कवी रूपचंद शिदोरे, ह भ प भागवत म. मरकड यांचा समावेश
अहिल्या नगर:-पाथर्डी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला श्रीरामपूर येथील लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहे, तशी अधिकृत माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पवार यांनी पत्रद्वारे दिली आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाथर्डी चे भूमिपुत्र श्री अनिल कुमार खाटेर यांना(पत्रकार भूषण) हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा संत ज्ञानेश्वर पुरस्कार पाथर्डी येथील ह भ प अमोल महाराज सोळशे यांना जाहीर झाला आहे. तसेच स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व हत्राळ येथील युवा कार्यकर्ते संभाजीराव बडे यांना (समाजभूषण पुरस्कार) जाहीर झाला आहे. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये व विशेषता गायन क्षेत्रांमध्ये ज्यांचे मोठे योगदान आहे ज्यांच्या गळ्यामध्ये आवाजाची जादू आहे असे गोड गळ्याचे गायक शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथील ह भ प भागवत महाराज मरकड यांना (संत ज्ञानेश्वर पुरस्कार) जाहीर झाला आहे. आणि काव्य क्षेत्रातील पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे शिदोरे येथील मूळ रहिवासी असलेले हल्ली अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेले कवी रूपचंद शिदोरे यांना (काव्यभूषण) पुरस्कार जाहीर झाला आहे. शिदोरे हे केंद्रीय सेवानिवृत्तीनंतर प्रथमच काव्य लेखनास त्यांनी प्रारंभ केला आहे व 29 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये त्यांच्या शब्दप्रहार भावनांचे या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक सर्वच विषयाला स्पर्श करून जाणाऱ्या त्यांच्या कविताने रसिक प्रेक्षकाला भुरळ घातली आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड सर व द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख सर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच कविवर्य बाळासाहेब कोठुळे, राजेंद्र उदारे, आत्माराम शेवाळे, शाहीर भारत गाडेकर , डॉक्टर कैलास दौंड, हुमायून आता र, शशिकांत गायकवाड, प्रदीप बोडके, वैद्य नंदकिशोर औटी यांनीही त्यांचे अभिनंदन केले. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक एक जून 2025 रोजी वडाळा महादेव या ठिकाणी 11 ते पाच या वेळेमध्ये संपन्न होणार आहे मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.



