बीड

“फार्मसी क्षेत्रात नवा मैलाचा दगड – प्रा. डॉ. निखिल जाधव यांचे पुस्तक एम.फार्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध”

“फार्मसी क्षेत्रात नवा मैलाचा दगड – प्रा. डॉ. निखिल जाधव यांचे पुस्तक एम.फार्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध”

माजलगाव / प्रतिनिधी:-माजलगाव – फार्मसी क्षेत्रात नवनवीन शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना दिशा देणारे गुरुकृपा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. निखिल जाधव यांनी एम.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त “मॉडर्न ऍनालॅटिकल टेक्निक्स” असे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे प्रथमदर्शी लोकार्पण गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष व प्रख्यात हृदयविकार तज्ञ डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी) विषयांमधील फार्मास्युटिकल ॲनालिसिस हा विषय सर्व डिपार्टमेंट साठी कॉमन आहे त्याच बरोबर यात सिलॅबसवर आधारित भारतीय लेखकांचे फारच तुरळक व समजण्यास कठीण पुस्तके आहेत त्याचबरोबर यांतील संकल्पना गुंतागुंतीची आणि भाषा अवघड असल्यामुळे विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात असे जाधव यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक ‘फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने’ निर्देशित केलेल्या बी. फार्मसी अंतिम आणि एम.फार्मसी प्रथमवर्ष अभ्यासक्रमातील फार्मास्युटिकल ॲनालिसिस विषयाशी निगडीत बनवले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सुलभ भाषेत आणि अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शन करणारे असून त्यात सविस्तर आकृत्या व माहितीपूर्ण तक्ते दिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील ॲनालिसिस विषयाची भीती निघून जावी तसेच विद्यार्थी परीक्षेसह संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रातही आत्मविश्वासाने पुढे जावेत, हा या पुस्तकामागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. निखिल जाधव यांनी सांगितले.
पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना डॉ. यशवंत राजेभोसले म्हणाले, “एम.फार्म विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देणारे हे पुस्तक निश्चितच शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर घालेल.” या कार्यक्रमास गुरुकृपा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे प्राचार्य अमित बिंदू, गुरुकृपा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. मकेश बाबू उपस्थिती लाभली. या यशाबद्दल सर्व स्टाफने जाधव सरांचे अभिनंदन केले.

Back to top button