ज्येष्ठ नेते अंकुशराव उगले यांना मातृशोक

*ज्येष्ठ नेते अंकुशराव उगले यांना मातृशोक*
जामखेड प्रतिनिधी : नायगाव येथील भूमिपुत्र तथा जामखेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते अंकुशराव उगले यांच्या मातोश्री जनाबाई विष्णु उगले यांचे वृद्धापकाळाने आज बुधवार दिनांक २० मे रोजी सकाळी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.जनाबाई उगले या मनमिळावू स्वभावाच्या असून अध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.मोठा मुलगा महादेव उगले हे निवृत्त पोलीस अधिकारी असून धाकटा मुलगा अंकुशराव उगले हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सुमन डोके व कमल राळेभात या त्यांच्या मुली असून सूना, नातसूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल उगले, नगरसेवक पवन राळेभात व विकी उगले हे त्यांचे नातू होत.जनाबाई उगले यांच्या निधनाने नायगाव व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



