📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

हिमाचल प्रदेश हून आलेल्या सफरचंदांच्या व्यापाऱ्याला ची ११लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला .


छत्रपती संभाजीनगर :येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील श्रीमती. ए. एस. वैरागडे साहेब यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात हिमाचल प्रदेशातील सफरचंदांच्या व्यापाऱ्याला ११लाख ,६४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी शाहेद शफीक बागवान (रा. जाधवमंडी, छत्रपती संभाजीनगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या निकालामुळे फिर्यादी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. किरण प्रकाश राजपूत यांनी बाजू मांडली.
फिर्यादी चे थोडक्यात हकीकत आशी की , फिर्यादी विपिन चव्हाण हे हिमाचल प्रदेश येथील व्यापारी आहेत , दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची आरोपी शाहेद बागवानशी ओळख एका मित्रामार्फत झाली. आरोपीने स्वतःला “ एस. के. शान फ्रूट एजन्सी, जाधवमंडी मार्केट छत्रपती संभाजीनगर,” या ठिकाणी फळ व्यापार करणारा म्हणून सांगितले . आरोपीने फोन आणि व्हॉट्सऑप द्वारे सफरचंदांच्या पेट्यांचे फोटो मागवून घेतले आणि “प्रती पेटी ₹३,००० ते ₹३,२००, तसेच छोट्या मालासाठी ₹१,८०० ते ₹२,२००” अशा उच्च भावात खरेदी करण्याचे आश्वासन दिले. हिमाचल प्रदेशात मिळणाऱ्या भावापेक्षा अधिक दर मिळतील या आशेवरून फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून एकूण ₹ ११लाख ,६४ हजार , किमतीचा माल मोठ्या आकाराच्या ३०० पेट्या ₹८.४० लाख, मध्यम आकाराच्या १५५ पेट्या ₹३.१० लाख आणि छोट्या आकाराच्या १० पेट्या ₹१४,००० असा सफरचंदांचा माल पाठवला. ६ ऑगस्ट २०२५ रोजी माल छत्रपती संभाजीनगर येथील आरोपीच्या गोदामावर पोहोचला. माल पाहून आरोपीने खात्री केली आणि त्या दिवशी पाऊस येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी विक्री करून पैसे देण्याचे सांगितले. मात्र, नंतर आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय माल अर्ध्या किमतीत दरात परस्पर विकला . परंतु आरोपीने रक्कम न पाठवता असे सांगीतले की,’संपूर्ण विक्री एवढीच झाली’ असे खोटे सांगून व्यवहार संपल्याचे दाखवले.
त्यानंतर फिर्यादीने आरोपीची खूप संपर्क केला परंतु आरोपी येणे उडवडीची उत्तरे देऊन काय करायचे करून घ्या असे बोलून उलट फिर्यादीला धमकी दिली तुम्ही फक्त औरंगाबादला येऊन दाखवा तुम्हाला दाखवतो मी कोण आहे माझे खूप वरिष्ठ लोकांशी व राजकारणी लोकांशी संपर्क आहे. असे सांगून फिर्यादी धमकी दिली त्यानंतर फिर्यादी हे बाहेर गावचे असल्यामुळे ते खूप भयभीत झालेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे ओळखीचे मित्र देवीचंदसिंह बारवाल (करणी सेना अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर कॅनॉट प्लेस) येथे येऊन भेट दिली व सर्व हकीकत सांगितली त्यानंतर देवीचंदसिंह बारवाल यांनी फिर्यादी यांना मदत करून पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्यादीची फसवणूक कशी झाली आहे .याबाबत पाठपुरावा करून पोलिसांना मदत केली व फिर्यादी ची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यावर सिडको पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी फिर्यादीची फिर्याद दाखल करून घेतली. सिडको पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२१/२०२५ असा गुन्हा भारतीय नयाय संहिते च्या कलम 316(2) व 318 (4) या प्रमाणे नोंदवला.
त्यानंतर आरोपीने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला . तेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आले की, आरोपी येणे माननीय न्यायालयात जमिनीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर फिर्यादीने आपली बाजू मांडण्याकरिता फिर्यादीच्या वतीने ॲड. किरण प्रकाश राजपूत यांची नेमणूक केली. फिर्यादीचे वकील यांनी माननीय न्यायालयास दक्षता आणून दिले की सदरचा आरोपी हा सराईस गुन्हेगार आहे हा फक्त लोकांची फसवणूक करतो व अशा पद्धतीचे गुन्हे करून उच्च वकील लावून जमिनीवर खुलेआम फिरतो व अजून भरपूर लोकांची फसवणूक केलेली आहे हे युक्तिवाद दरम्यान मा.न्यायालयासमोर आरोपीचे मागील गुन्ह्यांचा संपूर्ण तक्रारी चे तपशील हे मान्य न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सरकारी पक्ष व फिर्यादीचे वकील आणि आरोपीच्या वकिलांचा यक्तिवाद अंती निष्कर्षावर पोहोचले की, आरोपी हा सराईस गुन्हेगार आहे असून आरोपीला सदरील गुन्ह्यातून जामीन वर सोडणे योग्य नाही. म्हणून आरोपीची मा. न्यायालयाने आरोपीची जामीन चा अर्थ अर्ज नामंजूर केला. फिर्यादीच्या वतीने ॲड. किरण प्रकाश राजपूत व ॲड. राहुल पाटील यांनी सहकार्य केले.
मार्फत
ॲड.किरण प्रकाश राजपूत

Back to top button