📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शौर्य व शिवज्ञाच्या यशाचा गौरव: वृषालीताई कडलग व सुजाता पुरी यांची जामखेडमध्ये सदिच्छा भेट

शौर्य व शिवज्ञाच्या यशाचा गौरव: वृषालीताई कडलग व सुजाता पुरी यांची जामखेडमध्ये सदिच्छा भेट

जामखेड (प्रतिनिधी) — प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषालीताई कडलग मॅडम आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांची लाडकी कवयित्री सुजाता पुरी मॅडम यांनी जामखेड येथे सदिच्छा भेट दिली.

ही भेट शिक्षक प्रताप पवार व शुभांगीताई पवार यांचे सुपुत्र शौर्य आणि कन्या शिवज्ञा यांच्या विशेष सत्कारासाठी आयोजित करण्यात आली होती. शौर्यने इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २९० गुण मिळवले, तर शिवज्ञाने ‘मंथन’ स्पर्धा परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवत कुटुंबाचा आणि जामखेडचा गौरव वाढवला.

या दोघांच्या अपूर्व यशाबद्दल वृषालीताई कडलग मॅडम यांनी खास भेटवस्तू देत त्यांचा सत्कार केला. यावेळी वृषालीताईंना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बार्शी (जि. लातूर) येथे मानव विकास जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतरचा पहिला सत्कार करण्याचा मान जामखेडकरांना मिळाला. त्याचबरोबर सुजाता पुरी मॅडम यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

गोष्टी, गप्पा आणि स्नेहमिलनाने सजलेल्या या घरगुती सत्कार सोहळ्याला शुभांगीताई पवार, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख प्रताप पवार, तालुका समन्वय समिती सदस्य किशोर राठोड यांची उपस्थिती लाभली. शौर्य व शिवज्ञा हे भाचे कंपनी आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

यावेळी वृषालीताई कडलग व सुजाता पुरी
यांना पंच (भाऊ) पुस्तक भेट देण्यात आले.याचा विशेष आनंद व्यक्त कडलग व पुरी यांनी केले.

Back to top button