बीड

डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते रामचंद्र खोडके यांना मोफत स्कूटी चे वाटप

डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते रामचंद्र खोडके यांना मोफत स्कूटी चे वाटप

परळी तालुक्यात ४ दिव्यांगांना मिळाला  मोफत स्कुटिचा लाभ

परळी(प्रतिनिधी): दिनांक३० जुलै बीड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा समाज कल्याण च्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते डीग्रस येथील दिव्यांग रहिवाशी रामचंद्र वाचिष्ठ खोडके यांना मोफत स्कुटीचे वाटप करून या मोफत स्कूटी वाटप योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

बीड जिल्हा परिषदच्या जिल्हा समाज कल्याणाच्या योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात एकूण ५४ स्कुटींचे वाटप करण्यात आले आहे आणि त्यातील चार स्कुटिंचे वाटप परळी तालुक्यातील दिव्यांगांना झाले आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली.

आणि अशा या मोफत स्कूटी वाटप योजनेबद्दल मा आ.धनंजय मुंडे,पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे,तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्री अतुल सावे यांचे सर्व दिव्यंगांच्या वतीने आभार मानले.

मा.आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे दिव्यांगांसाठी विविध योजना आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना यशस्वी करून दिव्यांगंच्या जीवनात काहीतरी सुलभता कशी आणता येईल याचाच विचार ते सतत करत असतात.याचाच एक भाग म्हणजे ही मोफत स्कूटी वाटप योजना आहे.

अशा या मोफत स्कूटी वाटप योजनेमुळे परळी तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये एक आनंद उत्सव निर्माण झाला आहे आणि त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांनी मा. आ. धनंजय मुंडे ,ना.पंकजाताई मुंडे,दिव्याग कल्याण मंत्रालयाचे अतुल सावे तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांचे आभार मानले.

Back to top button