बीड

भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या हस्ते‌ व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव भाऊ  देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली श्री गणेशाच्या दिव्यमूर्तीचे भारतीय जनता पार्टी कार्यालय बीड येथे मोठ्या उत्साहात स्थापना.

भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या हस्ते‌ व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव भाऊ  देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली श्री गणेशाच्या दिव्यमूर्तीचे भारतीय जनता पार्टी कार्यालय बीड येथे मोठ्या उत्साहात स्थापना.
बीड प्रतिनिधी:-बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री गणेशाची स्थापना  करण्यात  श्री गणेशाची स्थापना करताना मुख्य यजमान म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या  हस्ते  श्री गणेशाचे शास्त्र युक्त पद्धतीने वैदिक मंत्राच्या साह्याने विधिवत पूजा करून ही स्थापना करण्यात आली यावेळी येथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ देशमुख साहेब तसेच देविदास नागरगोजे साहेब व नागरगोजे  साहेब तसेच शांतिनाथ डोरले संकेत सानप कृष्णा खेंडेकर गणेश लांडे केशव  बडे साहेब अनिल चांदणे  डॉक्टर वनवे साहेब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मीराताई गांधले मॅडम राजू शहाणे अमोल वडकिले राजेश चरखा भालचंद्र कुलकर्णी बाबुराव परळकर व पत्रकार संजय देवा कुलकर्णी पिपळगावकर सह  योगेश नाकाडे सह इतर  सर्व पदाधिकारी व गणेश भाविक  भक्त व  भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व श्री गणेश भक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गणेशाची स्थापना विधिवत पूजा करण्यासाठी श्री  वेदशास्त्र संपन्न विपुल रत्नपारखी देवा उपस्थित होते श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहामध्ये  आणि मोठ्या आनंदाच्या भक्तीमय वातावरणामध्ये व पवित्र  वैदिक मंत्राच्या जयघोषात संपन्न झाली आणि श्री गणेशाकडे सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली की बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडो सर्व लोक सुखाने गुना गोविंदाने नांदावे अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने‌ व उपस्थित सर्व गणेशभक्त यांच्या वतीने श्री गणराया कडे प्रार्थना करण्यात आली ..
Back to top button