बीड
बीड नगरपरिषद च्या विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन !

बीड नगरपरिषद च्या विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन !
खड्ड्यात बेशरम चे झाड लावून घोषणाबाजी
बीड / प्रतिनिधी :-शहरातील जुना बाजार कोतवाली वेस ते बलभीम चौक,कारंजा रोड,राजुरी वेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्त्याचा काम तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बीड नगरपरिषद च्या विरोधात जुना बाजार येथील रस्त्यावरील खड्ड्यात बेशरम चे झाड लावून अनोखे आंदोलन करण्यात आले.
असे की,बीड शहराच्या मध्ये भागातून जाणाऱ्या शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जुना बाजार कोतवाली वेस ते बलभीम चौक,कारंजा रोड राजुरी वेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पऱ्यांत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ – मोठाले खड्डे पडून सामान्य नागरिकांना रहदारीसाठी मोठा अडथळा येत आहे.शहरातील हा प्रमुख व्यापारी मार्ग असून दररोज या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक विविध व्यवसायाच्या निमित्ताने येतात तसेच
अनेक दिवसापासून रस्त्याच्या कामाला प्रलंबित ठेवलेला असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बीड नगर परिषदेने येथील नागरिकांची पिळवणूक थांबून तात्काळ रस्त्याचा काम सुरू करावा अशी मागणी करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वार्षताई जगदाळे (महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे बीड शहराध्यक्ष पठाण अमरजान यांच्या नेतृत्वाखाली जुना बाजार येथील रस्त्यावरील खड्ड्यात बेशरम चे झाड लावून बीड नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र व जोरदार घोषणाबाजी करत अनोखे आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेचे सदाशिव बिडवे (जिल्हा उपाध्यक्ष) आशा कुटे (बीड जिल्हाध्यक्ष),कल्पना कवठेकर (जिल्हा उपाध्यक्ष), सुरेखा ढाकणे,स्वराज मस्के,मोहम्मद सलीम,अब्दुल अजीम,तारेख चाऊस,रफिक शेख,मोमीन खादीर सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेआदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



