बीड

बीड शहरातील नगर नाका परिसरात अतिक्रमणावर मोठी कारवाई; ३५ अतिक्रमणे हटवली

बीड शहरातील नगर नाका परिसरात अतिक्रमणावर मोठी कारवाई; ३५ अतिक्रमणे हटवली
बीड(प्रतिनिधी )— बीड शहरातील नगर नाका परिसरात रस्त्यावर अनधिकृतपणे उभे असलेले हातगाडे, नाश्ता स्टॉल तसेच वाहने यावर आज सकाळी मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण ३५ अतिक्रमणे हटवण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत सर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष म्हणजे, ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस प्रशासन, आणि नगरपालिका अतिक्रमण पथक यांच्या संयुक्त पथकाने केली.
कारवाई दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष, पोलीस उपनिरीक्षक विजय, पोलीस हवालदार सुनील, पोलीस अंमलदार संतोष, विश्वजीत, वसीम, चालक संतोष, तसेच अतिक्रमण पथक प्रमुख मुन्ना गायकवाड, सुजित जाधव, विकी दांगट , शरद खूपसे, राम रोकडे, किरण शिंदे, लखन साबळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईदरम्यान काही ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून, अनधिकृत व्यापाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, भविष्यात अतिक्रमण आढळल्यास कठोर पावले उचलली जातील.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी कारवाई नियमित करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Back to top button