बीड

जामखेड पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जामखेड पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कला प्रकार

जामखेड प्रतिनिधी;-जामखेड शहरातील मोरे वस्ति येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जामखेड पब्लिक स्कूलच्या वतीने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा करून दिपप्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.राजल शांतीलाल गुगळे या होत्या.तर प्रमुख पाहुण्या सौ.पुष्पा सुवालाल गांधी होत्या.
यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी,ल.ना.होशिंग विद्यालय चे माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य सुजित उबाळे सौ.अंजली अरुण चिंतामणी,सौ.रत्नमाला सुरेश बेदमुथ्था,सौ.मिना अशोक शिंगवी,सौ.अनिस सैफुल्ला खान , दैनिक सुर्योदयचे उपसंपादक धनराज पवार आदी शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी गणेश वंदना‎ सादर केली.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले.‎विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कला प्रकार ,वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्या बरोबर चित्रपटातील गाण्यांवर नृत्य केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नाटक सादर केले. यावेळी लहान चिमुकल्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक भोगील सर, शिक्षिका सौ.डहाळे‌,सौ.चव्हाण,सौ.जिरेकर,सौ.हजारे,सौ.भोगील ,सौ.सातपूते कल्याणी,सौ.सातपूते कीर्ती,सौ.राळेभात,पुराणे सर,खरात सर,पुलावळे काका, काकडे मावशी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ डहाळे मॅडम व सौ चव्हाण मॅडम,सौ.जिरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुराणे सर यांनी मानले.प्राचार्य सुजित उबाळे व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते व भाषणांद्वारे उपस्थितांचे मने जिंकले.

*चौकट*
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता विविध कौशल्ये आत्मसात करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. शिक्षणासोबत क्रीडा आणि संस्कृतीही महत्त्वाची आहे.”
(प्राचार्य – सुजित उबाळे)
जामखेड पब्लिक स्कूल, जामखेड

Back to top button