तब्बल ७८ वर्षांनी मंडणगड तालुक्याला मिळाला जिल्हा परिषद अध्यक्ष मान…अध्यक्ष सौ अस्मिता ताई केंद्रे
तब्बल ७८ वर्षांनी मंडणगड तालुक्याला मिळाला जिल्हा परिषद अध्यक्ष मान…अध्यक्ष सौ अस्मिता ताई केंद्रे
मंडणगड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे कोकणचे भाग्यविधाते माजी मंत्री शिवसेना नेते सन्मा रामदास भाई कदम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदयजी सामंत महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री योगेश दादा कदम यांच्या शिफारशीने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. जिल्हा परिषदचे अध्यक्ष पदाचा बहुमान प्रथमच स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी मंडणगड तालुक्याला मिळाला आहे. आपल्या भिंगळोली जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या सौ अस्मिता ताई केंद्रे यांची जिल्हा परिषदेच्या ३४ व्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे ५६ पैकी ४१ जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहेत.मंडणगड तालुक्यातून शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रताप दादा घोसाळकर हे बाणकोट जिल्हा परिषद गटातून विजयी व सौ अस्मिता केंद्रे या भिंगळोली जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या. असे २ सदस्य जिल्हा परिषदेत मंडणगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य सर्व पंचायत समिती सन्मा सभापती उपसभापती पं स सदस्य मंडणगड शिवसेना महिला आघाडी तालुका कार्यकारणी युवासेना पदाधिकारी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख बुथप्रमुख सरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य शिवदूत महिला शाखा संघटक शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद येथे उपस्थित राहून नुतन अध्यक्षा सौ अस्मिता ताई केंद्रे यांचे अभिनंदन केले. कारण मंडणगड तालुक्याच्या इतिहासात हा सुवर्ण क्षण आहे.
नामदार श्री योगेश दादा कदम यांच्यामुळे मंडणगड तालुक्याला सर्वोच्च असे मानाचे पद मिळाले आहे.



