📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अंथरवण पिंपरी आश्रम शाळेत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

अंथरवण पिंपरी आश्रम शाळेत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

बीड (प्रतिनिधी):- बीड पासून जवळच असलेल्या श्री सद्गुरु बंजारा सेवा संघ बीड संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा तथा दीनानाथ बालक आश्रम अंथरवण पिंपरी (तांडा) ता. बीड येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य खंदारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव पवार, मुख्याध्यापक शिंदे सर, पर्यवेक्षक जवरे सर हे व्यासपीठावर अग्रस्थानी होते. सर्वप्रथम हरितक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तदनंतर मान्यवरांच्या शुभहस्ते निवासी व दीनानाथ बालकाश्रमच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिनेशराव पवार म्हणाले की, मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून नियमितपणे अभ्यास करावा. कठोर परिश्रम जो करेल तोच यशाची फळे चाखेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे व्ही.एन. यांनी तर आभार प्रदर्शन पवार सर यांनी मानले. या कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रम शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Back to top button