बीड

सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

बीड दि.17(प्रतिनिधी)ः-  गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण झाल्यामुळे सदर परिस्थितीची पूर्वतयारी आणि खबरदारी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक च्या सूचनेनुसार दि.17 मे 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये 40 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सल्लागार डॉ.अरुण भस्मे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी  डॉ.गणेश पांगारकर, डॉ.अंजली पवार, डॉ.विवेक दुसाने, डॉ.अशोक शिंदे, डॉ.अंजली ढोले, डॉ.वृषाली कुलकर्णी, डॉ.सारिका ससाने, डॉ.मीना हांगे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी भूषण अवसरमले, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी ओम आगरकर,  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रमेश थोरात, ओम आगरकर, प्रद्युम्न डहाळे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button