बीड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हजारो वर्षे स्मरणात : सभापती प्रा.राम शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हजारो वर्षे स्मरणात : सभापती प्रा.राम शिंदे
सभापती प्रा.राम शिंदेंची दिक्षाभूमीला भेट,अनुभवले शांततेचे महत्त्व
नागपूर – महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूर येथे दिक्षाभूमी ला भेट दिली असता यावेळी अभिवादन केले. फेसबुक पोस्टद्वारे प्रा. शिंदे यांनी ट्विट करत सांगितले की, पवित्र स्थळी स्वच्छता, शांतता आणि भक्तिभाव अनुभवताना अत्यंत समाधान वाटले.
सभापती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य योगदानाची स्मृती पुढील हजारो वर्षे नागरिक विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण समाजात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहोत.
दिक्षाभूमी ही डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचे प्रतीक असून, देशभरातून नागरिक अभिवादनासाठी येथे येतात. प्रा. शिंदे यांच्या भेटीमुळे या पवित्र स्थळाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व पुन्हा लक्षवेधक ठरले.
या प्रसंगी प्रशांत कुलकर्णी, विभागीय उपआयुक्त (सामाजिक न्याय विभाग, नागपूर), जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच भाजपा चे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



