हद्द निश्चिती नाही तर उपोषण – खासदार निलेश लंके जामखेड बंदची हाक मागे; साखळी उपोषण मात्र सुरूच

हद्द निश्चिती नाही तर उपोषण – खासदार निलेश लंके
जामखेड बंदची हाक मागे; साखळी उपोषण मात्र सुरूच
जामखेड प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग कामाची अनियमितता व अतिक्रमणे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण सुरु केले आहे. आज जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आज खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला व उद्या जर दहा वाजेपर्यंत हद्द निश्चित करण्यासाठी अधिकारी आले नाहीत तर पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर खासदार अमरण उपोषणाला बसणार आहेत असे जाहीर केले. तसेच उद्या जामखेड चा बाजार असल्याने गैरसोय नको म्हणून जामखेड बंद मागे घेण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, जामखेड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी अवधूत पवार सह सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. आज जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. आज व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला उद्या बाजार असल्याने सर्वाचे हित पाहता जामखेड बेमुदत बंद मागे घेत साखळी उपोषण सुरूच राहणार असे जाहीर केले. तसेच जामखेड च्या सर्व पक्षीय एकजुटीचा राज्याने आदर्श घ्यावा असेही लंके यांनी सांगितले. तसेच उद्या दहा वाजेपर्यंत जर हद्द निश्चिती साठी अधिकारी आले नाहीत तर अकरा वाजेपासून पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी खासदार निलेश लंके, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर,प्रा.संजय वराट, सुरेश भोसले,माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, शहाजी राळेभात, प्रदीप टापरे, प्रवीण बोलभट,अमित चिंतामणी,प्रा.लक्ष्मण ढेपे, प्रशांत राळेभात, प्रा. विकी घायतडक, अँड हर्षल डोके, राहुल उगले, मंगेश आजबे, राजेंद्र गोरे,कुंडल राळेभात,पवन राळेभात, सुनिल जगताप,बाबा चंदन, प्रा. शहाजी डोके,प्रवक्ते डॉ.कैलास हजारे,रंगनाथ राळेभात,अनिल सदाफुले, हरिभाऊ आजबे,अमोल गिरमे, वसिम सय्यद, काकासाहेब कोल्हे,अमोल लोहकरे,सुनिल उगले, बजरंग डुचे, संदीप (आण्णा) गायकवाड, दत्तात्रय डिसले,यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने आजपासून जामखेड शहर कडकडीत बंद करण्यात आले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी आप- आपली दुकाने बंद ठेवत अतिक्रमण हटाव साठी पाठिंबा दिला होता. मात्र उद्या बाजार असल्याने गैरसोय नको म्हणून उद्या चा बंद मागे घेण्यात आला आहे,मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
चौकट
———————-
खासदार निलेश लंके यांची सडेतोड भुमिका
सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्या साखळी उपोषणाला व जामखेड बंद बाबत खासदार निलेश लंके यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आज जामखेड च्या ज्वलंत अतिक्रमण प्रश्नांसाठी जामखेड कर एकजुटीने एकवटले आहेत जामखेड करांचा आदर्श राज्याने घ्यावा असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. यावेळी सर्व अधिकारी यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला व उद्या पासून हद्द निश्चिती च्या कामाला सुरुवात करावी अन्यथा मी उद्या पासून पुणे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याविषयीचे निवेदन मेलवर पाठवले आहे. खासदार निलेश लंके यांच्या सडेतोड भुमिकेमुळे जामखेड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.



