बीड

उद्या शनिवार रोजी जामखेडमध्ये बांधकाम कामगारांसाठी मेळावा; आरोग्य तपासणी व कार्ड वाटप

उद्या शनिवार रोजी जामखेडमध्ये बांधकाम कामगारांसाठी मेळावा; आरोग्य तपासणी व कार्ड वाटप

जामखेड : जामखेड शहरातील बांधकाम कामगारांसाठी तसेच इतर कामगारांसाठी विशेष मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, १४ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महावीर मंगल कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या मेळाव्यात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी, आरोग्य कार्ड वाटप तसेच अटल बांधकाम कामगार प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

कामगार बांधवांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असून जास्तीत जास्त कामगारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button