बीड
सासवडमध्ये केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विकास योजना राबवणार – आनंदीकाकी जगताप

सासवडमध्ये केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विकास योजना राबवणार – आनंदीकाकी जगताप
पुरंदर सासवड (प्रतिनिधी):-केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजना प्रभावीपणे राबवून सासवडचा सर्वांगीण विकास केला जाईल असे प्रतिपादन सासवडच्या नुतन नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी केले. सासवड येथे नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज दि.०२ रोजी आनंदीकाकी जगताप यांनी स्वीकारला यावेळी मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. माजी आमदार संजय चंदुकाका जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, शहराध्यक्ष आनंद भैय्या जगताप, सत्ताधारी गटाचे नेते अजित जगताप व नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. सासवडकर नागरिकांनी माझ्यावर टाकलेला व दिलेली जबाबदारी मी सार्थ ठरवेळ सर्व नागरीक आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन एकमताने सर्वांगीण विकास केला जाईल माजी आमदार व भाजपा नेते संजयजी जगताप यांच्या कल्पने प्रमाणे शहराचे सुशोभीकरण व विकासकामे करण्यास प्राधान्य दिले जाईल असेही आनंदीकाकी जगताप यांनी सांगितले.भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी सांगितले की बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या शून्य होती आता ही संख्या ६४ वर पोहचली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सासवडचा कायापालट करण्यास लोकप्रतिनिधी कटीबद्ध माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी प्रास्ताविकात दिवंगत लोकनेते चंदुकाका जगताप यांच्या विकासकामांचा वारसाचा उल्लेख केला. मागील काळात तत्कालीन आमदार संजय चंदुकाका जगताप आणि आनंदीकाकींचा मार्गदर्शनामुळे शहराची प्रगती झाली. आता अधिक वेगाने प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला.माजी उपनगराध्यक्ष संजय गणपत जगताप यांनी आभार मानले.
फोटो ओळ:-सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी सोबत माजी आमदार व भाजपा नेते संजयजी चंदुकाका जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे व मान्यवर सदस्य


