राज्यस्तरीय १२ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत ‘माईलस्टोन स्कूल’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी; मुलांना रौप्य तर मुलींना चौथा क्रमांक

राज्यस्तरीय १२ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत ‘माईलस्टोन स्कूल’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी; मुलांना रौप्य तर मुलींना चौथा क्रमांक
प्रतिनिधी | बीड
पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय १२ वर्षांखालील रग्बी क्रीडा स्पर्धेत बीड जिल्हा संघाने ऐतिहासिक आणि घवघवीत यश संपादन केले आहे.या दैदिप्यमान यशात माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या दर्जेदार खेळाडूंनी आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवत बीड जिल्ह्यासह आपल्या शाळेचे नाव महाराष्ट्रात उज्ज्वल केले.
स्पर्धेत मुलांच्या संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत थेट अंतिम फेरी गाठली आणि महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. तर मुलींच्या संघानेही काँटे की टक्कर देत राज्यात चौथा क्रमांक मिळवला. या दोन्ही संघात माईलस्टोन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत माईलस्टोन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक रग्बी खेळत प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली. रौप्यपदक विजेत्या मुलांच्या संघात: माईलस्टोनचे यश बनसोडे, स्वराज जाधव, तेजस नरवडे, आणि अर्णव शिंदे , साई चौरे यांनी मैदानावर उत्कृष्ट ताळमेळ दाखवत संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या संघात त्यांना शुभम घोडके, वेदांत घोडके, आर्यन लाखूटे, ऋषिकेश नरवडे, शिवम डंबरे आणि समर्थ वनवे यांची मोलाची साथ लाभली.
चौथ्या क्रमांकाच्या मुलींच्या संघात: माईलस्टोनच्या अनुष्का भिसे, ईश्वरी गुरसाळे, नीरजा तांबे, ओवी नरवडे, शरयू शेळके आणि आयुष्य कुलकर्णी यांनी आपल्या अफाट ऊर्जेने आणि कौशल्याने मैदान गाजवले. त्यांना प्रज्ञा वाघमारे, श्रेया वाघ, श्रावणी हाटवटे, अमृता इंगोले, श्रद्धा पिंगळे, समृद्धी जटाळ आणि अस्मिता गवळी यांनी उत्तम साथ दिली.
या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शोएब खाटीक, अशोक चौरे, नितीन येळवे, प्रकाश शिंदे व सोनाली शिंदे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विद्यार्थांच्या या यशाबद्दल माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शंकर पवळ,सचिव ज्ञानेश्वर तांबे उपाध्यक्ष नम्रता भानुसे, मुख्याध्यापिका सारिका जगताप तसेच बीड जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष शेख इसाक, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले व कार्याध्यक्ष नितीन येळवे यांनी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक प्रशिक्षकांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
—
*केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आमचे विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल*
आमच्या माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आमचे विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल आहेत, हे त्यांनी या कामगिरीतून सिद्ध केले आहे. मुलांनी मिळवलेले रौप्य पदक आणि मुलींनी मिळवलेला चौथा क्रमांक हा त्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि आमच्या क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचा परिणाम आहे.
-ज्ञानेश्वर तांबे (सचिव, माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल)



