रायगड

पाली सुधागड मध्ये मेंढपाल हजर..मेंढपाळ कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिने सुधागड मध्येच…

पाली सुधागड मध्ये मेंढपाल हजर..मेंढपाळ कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिने सुधागड मध्येच…

पाली /सुधागड — राम तुपे

घाटमाथ्यावर असणाऱ्या दुष्काळी भागातून मेंढपाळांचा मोठा समुदाय आपल्या हजारो मेंढ्या घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याच्या भागात दाखल झाले आहेत डोक्यावर भगवा फेटा किंवा पांढरी टोपी खांद्यावर घोंगडी हातात काठी घेऊन जिवाभावाच्या मेंढ्यांची राखण करणारा मेंढपाल तालुक्यात हजर झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाल कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिने सुधागड तालुक्यातील परिसरात तळ ठोकून असतात एप्रिल महिन्याच्या शेवट ते मे महिन्यात शेवटपर्यंत पुन्हा आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतात दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने मेंढपाळ रायगड जिल्ह्यात येतात यंदा पावसाने उशिरापर्यंत राहिल्यामुळे यंदा मेंढपाळ हे उशिरा दाखल झाले आहेत आपला पारंपारिक जीवन जगत पत्रकाच्या साह्याने कुटुंबाचा गाडा चालवत आहेत . कोकणात येण्याची परंपरा कायम ठेवला आहे सध्या हे मेंढपाळ परली, जांभूळपाडा, पेडली, असरे, नवघर, कोंडगाव, ठाणाले, तिवरे,चिवे, मजरे जांभूळपाडा, रासळ, या भागात मुक्काम करत असतात शेतजमिनी आणि माळरानावर मुबलक चारा व पाण्याची उपलब्ध असल्याने दरवर्षी हा भाग त्यांची तात्पुरता कर्मभूमी बनते शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यानंतर त्या जमिनीत मेंढपाल आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आणत असतात शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवण्यासाठी मेंढपाळांना काही धान्य आणि रोख रक्कमही देत असतात . एका मेंढपाळाने सांगितले की माझ्याकडे 200 मेंढ्या व 50 बकरी आहेत. मेंढ्यांनी शेतात मुक्काम केल्याने पिकासाठी नैसर्गिक खत ( शेणखत) मिळते आणि जमीन कसदार होते त्यामुळे शेतकरी व मेंढपाल यांचे एक पारंपरिक आणि परस्पर पूरक संबंध आजही या भागात टिकून आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे यावे लागते या भागात आमच्या मेंढ्यांना भरपूर चारा आणि पाणी मिळते शिवाय शेतात मेंढ्या बसवल्याने शेतकऱ्यांकडून धान्य ही व पैसेही मिळतात.

Back to top button