संपादकीय

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का ? राऊतांचा पडळकरांना सवाल

 

मुंबई | दोन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर याना सवाल केला आहे. तुम्हाला एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का ?असा सवाल राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल राज्य सरकारने, अनिल परबांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या या संपातून तोडगा काढण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी चांगली घोषणा केली.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुढे तरतूदही होणार आहे. तरीही कामगारांचे नेते आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत. यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. यावर पडळकर काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button