संपादकीय

“जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण” शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेट्टी आक्रमक

 

सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य तसेच केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी म्हणून शेट्टी शुक्रवारी दुपारी आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, फक्त जरंडेश्वरच नाही अनेक कारखाने आहेत. सगळे सारखेच आहेत, पण सोयीचे तेवढे काढायचे बाकीच्या झाकायचेअसा प्रकार सुरू आहे.

पुढे शेट्टी म्हणाले की, फक्त जरंडेश्वरच टार्गेट का याचे ऊत्तर आरोप करणार्या किरीट सोमय्या यांनी द्यावे. गैरव्यवहार झालेल्या कारखान्यांची यादी मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत. मी महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजपा सरकारवर खुश अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार, जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण आहे.

जयसिंगपूर इथे झालेल्या ऊस परिषदेतील ठराव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले अशी माहिती शेट्टी यांनी दिली. एफआरपी एकरकमीच हवी. डिसेंबरमध्ये ३१००रूपये द्यावे. ऊर्वरित रक्कम जानेवारीत द्यावी. साखरेचे भाव आता केंद्र सरकारने वाढवावेत. किमान ३७ रूपये असा भाव करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Back to top button