बीड
शिव, वैष्णव भेद करू नये ; परमात्मा एकच आहेत:-ह.भ.प. रामेश्वर महाराज थोरबोले

शिव, वैष्णव भेद करू नये ; परमात्मा एकच आहेत:-ह.भ.प. रामेश्वर महाराज थोरबोले
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे श्रावण सोमवार व एकादशी निमित्त कीर्तन
बीड (प्रतिनिधी) लाखो वर्ष शिव व वैष्णव यांच्यामध्ये अनेक जण भेदाभेद करतात अनेक पिढ्या या संघर्षामध्ये बरबाद झाल्या धर्मजाती पंतांच्या पुढे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले परमात्मा एक आहे तो सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो संत तुकाराम महाराज म्हणतात की हरीहरात शिव आणि वैष्णव असा भेद करू नये या जगात परम तत्व परमात्मा एकच आहे. ती फक्त वेगवेगळ्या रूपाने आपल्यासमोर असते म्हणून शिव,वैष्णव भेद करू नये असे ह.भ.प. रामेश्वर महाराज थोरबोले यांनी कीर्तन सेवेत अभंग विवेचन केले.
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सदगुरू ह.भ.प. वै.किसन बाबा महाराज यांच्या पासून नित्य नियमाने प्रत्येक एकादशी दिवशी व श्रावण सोमवारी कीर्तनाचे आयोजन केले जात आहे गुरुवर्य शांतीब्रह्म ह.भ.प.नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एकादशीचे कीर्तन ह.भ.प. रामेश्वर महाराज थोरबोले यांची होती.
श्रावण सोमवार निमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दुपारी कीर्तन सेवा ह.भ.प. अचित महाराज रेडे सिद्धेश्वर संस्थान देवळा यांचे संपन्न झाले
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विवेचन करताना थोरबोले महाराज पुढे म्हणाले की आज शिवशंकर महादेवाचा श्रावण सोमवार आहे व पांडुरंग नारायणाची एकादशी आहे अनेक जण नारायण आणि शिवशंकरामध्ये भेद करतात हा भेद योग्य नसून ही दोन्हीही रूप सृष्टीचा पालन करणाऱ्या परमात्म्याची आहेत असे थोरबोले महाराज म्हणाले यावेळी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी ,गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते



