बीड

पालकमंत्री अजितदादा, बीडच्या विमानतळाईतकीच जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांची काळजी घ्या ;  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमान उड्डाण लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे

पालकमंत्री अजितदादा, बीडच्या विमानतळाईतकीच जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांची काळजी घ्या ;  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमान उड्डाण लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे

बीड :- ( दि.०७ )  बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मंजुर केलेल्या बीड जिल्हा विकासाचा ७७५ कोटी रुपयांचा आराखडा असताना आतापर्यंत केवळ ४० लाख रुपये निधी उपलब्ध झाले असुन हा निधी बीडच्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था असुन मोडकळीस आलेल्या शाळांचे भिंती, छप्पर कोसळुन विद्यार्थी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.गेल्या आठवड्यात पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत रात्री कोसळल्याने दुर्घटना घडली नाही परंतु धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील छताच्या भाग डोक्यात कोसळुन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुलभूत सुविधांची विमानतळापेक्षा जास्त आवश्यकता असुन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विमानतळासाठी जेवढी काळजी करत आहेत तेवढीच काळजी या मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांमधील विद्यार्थ्यांची घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०७ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “कागदी विमान” उडवत ” विमान उड्डाण लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात रामनाथ खोड,शेख युनुस,सुदाम तांदळे,मुबीन शेख,शिवशर्मा शेलार ,  शेख मुस्ताक,माजी सैनिक अशोक येडे बीड जिल्हाध्यक्ष आप, रामधन ज्या बीड जिल्हाध्यक्ष ( इंटक)आदी सहभागी होते. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन दिले.

सविस्तर माहितीस्तव

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४७६ शाळा असुन ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या धोकादायक मोडकळीस आलेल्या असुन त्याठिकाणी अध्यापन करण्यात येऊ नये अशा शिक्षण विभागाने कळविले आहे.तर ७४९ वर्गखोल्यांची किरकोळ दुरुस्ती आणि ८५६ वर्गखोल्यांची मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.तर ७८० शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याने डिजिटल शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. उघड्यावर भरणाऱ्या, झाडाखाली, पत्र्यांच्या शेडमध्ये,किरायाच्या रूममध्ये भरणा-या शाळा, पावसाळ्यात गळक्या ईमारती,दारे खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुलभूत सुविधांची वानवा आहे.

५५ कोटींचा प्रस्ताव २ वर्षांपासून धुळखात पडुन

५४१ वर्गखोल्यांच्या मोठ्या दुरुस्ती करीता १३ कोटी १४ लाख ६३ हजार रूपयांचा निधी आणि ५१९ धोकादायक वर्ग खोल्यांच्या बांधकाम व पत्र्यांच्या शेडमध्ये भरणाऱ्या ३८ शाळांमधील ३८ वर्गखोल्या बांधकामासाठी असे एकुण ५५ कोटी ७० लाख रुपये निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडून २ वर्षांपासून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.मात्र याकडे  शासनाचे दुर्लक्ष असुन निधी देण्यात हात आखडता घेतला जात असल्याचे वास्तव दुर्दैवी आहे.

Back to top button