बीड

ना.पंकजाताई मुंडे यांचा १५ पासून बीड जिल्हा दौरा ; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा

ना.पंकजाताई मुंडे यांचा १५ पासून बीड जिल्हा दौरा ; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा
*गेवराईत नगरपरिषदेचे कार्यक्रम; विविध विकास कामांचा आढावा, बैठका व उद्घाटन आदी कार्यक्रमाना उपस्थिती*

परळी वैजनाथ, दि. १४
राज्याच्या पर्यावरण व  पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई  मुंडे हया उद्या १५ जुलै पासून बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात  परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा त्या आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा, शासकीय बैठका, उद्घाटन समारंभ तसेच कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी असा त्यांचा विस्तृत दौरा कार्यक्रम असणार आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या दौऱ्याची सुरुवात १४ जुलै रोजी मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे आगमनाने होणार आहे. त्यानंतर १५ जुलै रोजी त्या गेवराई येथे विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी नगर परिषद सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे सुपरलक्ष्मी गोल्ड चक्की आटा उद्योगाच्या शुभारंभ कार्यक्रमालाही त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासा संदर्भातील मंजूर आराखड्या संबंधाने आढावा बैठक घेणार आहेत.परळी वैजनाथ  येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ३०१.५४ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिली असून या योजनेसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा त्या घेणार आहेत. दुपारी चार वाजता नगर रोड परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी बीड, गेवराई आणि आष्टी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला असून त्यानंतर त्या परळी वैजनाथकडे रवाना होतील.
१६ जुलै रोजी सकाळी ११ ते १ परळी-माजलगाव मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी परळी वैजनाथ येथील विशेष शासकीय विश्रामगृहात वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. तर १७ जुलै रोजी अंबाजोगाई येथे ‘जस्ट नॅचरल्स’ या सेंद्रिय कृषी व नैसर्गिक उत्पादनांच्या शॉपचे उद्घाटन ना. मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर केज मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्या पुन्हा परळी वैजनाथ येथे दाखल होतील. सायंकाळी परळी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
••••

Back to top button