मुंबई

अमित ठाकरे नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे आज करणार उद्घाटन

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २ आठवडे क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले दिसून येतायत.

अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ५ शाखेचे उद्घाटन करणार आहेत. आगमी नवी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर ह्या दौऱ्याकडे पहिले जात असून संघटन बांधणीवर पक्षाने अधिक लक्ष घातलेले यातूनच दिसून येत आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे अमित यांचं स्वागत करणार आहेत.

कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा कोरोना संसर्ग रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तत्पूर्वी मनसेने येणार्यक आगामी महानगर पालिका निवडणुकीचा जोरदार तयारी सुरु केली आह त्याचा एक भाग म्हणून आज अमित ठाकरे यांच्या दौऱ्याकडे पहिले जात आहे.

Back to top button