📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जागतिक सहकार वर्षात तुळजाभवानी अर्बनचा मानाचा सन्मान

 जागतिक सहकार वर्षात तुळजाभवानी अर्बनचा मानाचा सन्मान
 ‘सहकार मंथन २०२५’ मध्ये ग्रीन वर्ल्ड को-प्राइड पुरस्काराने गौरव
सुहास सावंत / माजलगाव
जागतिक सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात आपली भक्कम ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार मंथन २०२५’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात तुळजाभवानी अर्बन बँकेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली.
या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील अनुभव, बदलती परिस्थिती, आव्हाने तसेच भविष्यातील संधी यावर सखोल विचारमंथन झाले. सहकार तत्त्वांचे काटेकोर पालन, ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन आणि समाजाभिमुख आर्थिक सेवा या निकषांवर तुळजाभवानी अर्बन बँकेची विशेष निवड करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुळजाभवानी अर्बन बँकेस ग्रीन वर्ल्ड को-प्राइड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री. दीपक तावरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद काळे आणि ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष श्री. गौतम कोतवाल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना तुळजाभवानी अर्बनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक शेजूळ व श्री. सुमित शेंडगे, मुख्य अधिकारी श्री. भास्कर गवळी तसेच श्री. अशोक मगर उपस्थित होते. या सन्मानामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेला व विश्वासार्हतेला अधिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
हा पुरस्कार केवळ संस्थेच्या यशाची पावती नसून सभासद, खातेदार व ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक परिश्रमांचे हे फलित असल्याचेही सांगण्यात आले.
भविष्यात सहकार तत्त्वांवर आधारित विकासाभिमुख, लोकाभिमुख व पारदर्शक वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार तुळजाभवानी अर्बन बँकेच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.
Back to top button