बीड
बीड शहरातील मोकाट कुत्र्यांचा व मोकाट रस्त्याने फिरणाऱ्या जनावरांचा सी ओ साहेब बंदोबस्त करा अन्यथा बीड नगरपालिकेत मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे आणून सोडू

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांचा व मोकाट रस्त्याने फिरणाऱ्या जनावरांचा सी ओ साहेब बंदोबस्त करा अन्यथा बीड नगरपालिकेत मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे आणून सोडू
नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांचा खणखणीत बीड नगरपालिकेला
इशारा .
बीड प्रतिनिधी:बीड नगर परिषदेला कर्तव्यदक्ष लाभलेले सी ओ साहेब आपण एकदा बीड शहरांमध्ये सर्वत्र फिरून चक्कर मारून या नंतर आपल्याला समजेल की नेमकं बीड शहरांमध्ये नेमकं चालले आहे तरी काय बीड शहरांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य नाल्या कोंडलेले आहेत व्यवस्थित नाहीत ठीक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे कुठे कुठे तर पाईपलाईन मध्ये मेलेले कुत्रे आढळतात हे मागच्या काही महिन्यापूर्वी दिसून आले आणि घाण कचरा देखील मोठे मोठे ढिगारे बीड शहरामध्ये ठीक ठिकाणी दिसून येत आहेत बीड नगर प्रशासनाला हे दिसत नाहीत का असा प्रश्न देखील आता बीड शहरातील नागरिकांना पडला आहे तसेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून तसेच मोकाट जनावर देखील बीड शहरातील विविध गल्लीबोळामध्ये आढळून येत आहेत आणि बीड शहरातील सर्वत्र प्रसिद्ध असलेले मार्केट भाजी मंडई या ठिकाणी देखील मोकाट कुत्रे भरपूर लोकांना त्या ठिकाणी आढळतात व त्या ठिकाणी संस्कार महाविद्यालय शाळा असल्यामुळे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना देखील या मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे डायरेक्ट माणसाच्या अंगावर चावा घेण्यासाठी कुत्रे धावून जातात असे अनेक ठिकाणी बीड शहरातील गल्ल्यामध्ये बोळीमध्ये मोकाट जनावर मोकाट कुत्रे दिसून येत आहेत म्हणून सी ओ साहेब आपण लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करा त्यांच्यासाठी कोंडवाडा जो बंद पडलेला आहे तो तात्काळ चालू करा आणि त्या कोंडवाड्यामध्ये नेऊन हे मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे घाला आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी नगर प्रशासनाच्या वतीने करा अन्यथा बीड नगरपालिकेमध्ये बीड शहरातील सर्व मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे आणून आम्ही सोडू असा खणखणीत इशारा देखील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती मा श्री नवनाथ जी अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून बीड नगर परिषदेला इशारा दिला आहे आता या वर बीड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ साहेब कशाप्रकारे दखल घेतात आणि कशाप्रकारे बीड शहरातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा सुळसुळाट थांबवतात हे पाहणे देखील येणाऱ्या भविष्य काळामध्ये गरजेचे असल्याचे बीड शहरातील सर्व नागरिकांमधून बोलले जात आहे .



