बीड

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ सेवा रत्न पुरस्काराने ज्योती विजयकुमार गिरे सन्मानित

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ सेवा रत्न पुरस्काराने ज्योती विजयकुमार गिरे सन्मानित

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा *पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ सेवा रत्न पुरस्कार* यंदा यशोदीप गुरुकुलच्या संचालिका ज्योती विजयकुमार गिरे यांना प्रदान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक १४ मार्च रोजी पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा व श्री शक्ती प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा दरवर्षी सन्मान करण्याची ही परंपरा असून, यावर्षी शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल ज्योती गिरे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम नेत्या सौ. ज्योतीताई विनायकराव मेटे या होत्या. त्यांच्या हस्ते तसेच सरपंच मंजुषा गाडीवान, माजी नगरसेविका जयश्रीताई विधाते, पसायदान सेवा प्रकल्पाच्या संचालिका रंजना गोवर्धन दराडे, प्रियंका तोष्णीवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती गिरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक परिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिला, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशोदीप गुरुकुल परिवार तसेच परिसरातील नागरिकांनी ज्योती विजयकुमार गिरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
Back to top button